व्हिएतनाममधील 'पिकलबॉल वर्ल्ड कप (Pickleball World Cup) २०२६' मध्ये भारताने ७ सुवर्ण पदके एकूण ४१ पदकांसह चौथ्या स्थानावर मजल मारली आहे.
ठळक मुद्दे:
- 'भारतीय पिकलबॉल संघटनेच्या (Indian Pickleball Association - IPA)' नेतृत्वाखालील भारतीय संघाने व्हिएतनाममधील 'पिकलबॉल वर्ल्ड कप २०२६' मध्ये चौथे स्थान पटकावले आहे.
- व्हिएतनाममधील दा नांग (Da Nang) येथे ३० ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही स्पर्धा पार पडली आहे.
- सदर स्पर्धेत भारताने ७ सुवर्ण, १७ रौप्य आणि १७ कांस्य अशा एकूण ४१ पदकांची कमाई केली आहे.
पदकतालिका क्रमवारी:
- १. व्हिएतनाम (११६ सुवर्ण, ८१ रौप्य, ७४ कांस्य पदके - एकूण २७१)
- २. दक्षिण कोरिया (११ सुवर्ण, ९ रौप्य, ५ कांस्य - एकूण २५)
- ३. अमेरिका (९ सुवर्ण, १० रौप्य, ९ कांस्य - एकूण २८)
'पिकलबॉल वर्ल्ड कप २०२६' बाबत महत्वपूर्ण माहिती:
- यंदाची २०२६ ची ही स्पर्धा 'पिकलबॉल वर्ल्ड कप'ची चौथी आवृत्ती होती.
- अतिशय वेगाने लोकप्रिय होत असलेल्या पिकलबॉल या खेळाचे सादरीकरण करणारी ही एक प्रमुख जागतिक स्पर्धा आहे.
भारताची कामगिरी:
सांघिक स्पर्धा:
- वीर शाहच्या नेतृत्वाखालील 'किड्स' (मुलांचा) संघ - रौप्य पदक
- वीर शाह - 'सर्वोत्कृष्ट कर्णधार' (Best Captain)
वैयक्तिक स्पर्धा:
- भूषण अकुत - ६०+ वयोगटात ३ सुवर्णपदके
- पूर्वांश पटेल, फेरोज झैदी आणि विवेक रेड्डी - आपापल्या स्पर्धा प्रकारांमध्ये सुवर्णपदके